Skip to main content

Posts

"जागतिक लोकसंख्या दिवस"११जुलै .. थीम २०२५

11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत. विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. हय़ा शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या, अनेक देशांच्या इतिहासाला कलाटणी देणार्या घटना, घडामोडी घडल्या. दोन जागतिक महायुध्दे, वसाहातिक देशांनी मिळविलेले स्वातंत्र्य, चंद्रावर मानवाचे पाऊल, अणुस्फोटामुळे समाप्त झालेले दुसरे महायुध्द, व्हिएतनामने अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, अनेक मौलिक शोध, संशोधन, रशियाचा उदयास्त. हय़ा काही प्रतिनिधीक घडामोडी, घटना होत. हय़ाशिवाय 20व्या शतकात झालेली विश्वलोकसंख्येतील प्रचंड वाढ ही विशेष क्रांतिकारी घटना होय. 1927 साली विश्वलोकसंख्या होती 2 अब्ज, अवघ्या 30 वर्षात ती झाली 1959 मध्ये 3 अब्ज आणि 39 वर्षात विश्वलोकसंख्या दुप्पट म्हणजे 6 अब्ज. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जाचे अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `व...
Recent posts

संच मान्यता 2024 जिल्हा परिषद अमरावती..

शिक्षण हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे माध्यम आहे, जर शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत ढाचा खचायला लागला, तर त्या समाजाचं भवितव्यही ढवळून निघते. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यात संच मान्यता; एक एप्रिल 2025 पासून लागू झाल्यानंतर अशीच स्थिती निर्माण झाली आहे.  प्राथमिक शिक्षणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या योजनेमुळे प्रत्यक्षात शाळा बंद होण्याची वेळ आली आहे, शिक्षक "अतिरिक्त" ठरवले जात आहेत आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात येत आहे. संच मान्यता म्हणजे जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील शाळांचे प्रशासकीय आणि शैक्षणिक पुनर्रचना ते सध्या आधार व्हेरिफाइड करीत आहेत. शिक्षकांची संख्या  विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे निश्चित केली जाते, ज्यामुळे प्रशासकीय सुलभता,शिक्षकांचे कार्यक्षम नियोजन आणि  गुणवत्तेच्या दृष्टीने प्रयत्न,(PTR ) हे उद्दिष्ट चांगले असले तरी प्रत्यक्षात संच मान्यता अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या विरोधात जाताना दिसते. अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत मराठी आणि उर्दू  शाळा संख्या: 1548 केंद्रशाळा संख्या: 139 आहेत. संचमान्यता 2023-24 न...

पटसंख्या घटल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात 35 शिक्षक निलंबित...

पटसंख्या घटल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ३५ शिक्षक निलंबित . जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे आणि शिक्षकांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर आढळून आल्यामुळे जिल्हा परिषदेने कठोर निर्णय घेत १० दिवसांत तब्बल ३५ शिक्षकांना निलंबित केले आहे. शिक्षण उपसंचालक गुलाबराव खरत यांनी यासंदर्भातील कार्यवाही करत स्पष्ट केले की, शाळांमधील घटती पटसंख्या, गुणवत्तेतील घसरण आणि जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक बनले होते. ही कारवाई शिक्षण विभागाकडून 'अकार्यक्षम शिक्षक शोध मोहीम' अंतर्गत करण्यात आली असून यात विशेष समित्या नियुक्त करून निरीक्षण व चौकशी केली गेली. निरीक्षणात हे स्पष्ट झाले की अनेक शाळांमध्ये शिक्षक शाळेत उपस्थित राहूनही अध्यापन कार्य करत नाहीत. विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावली असून इयत्ता ५वी व ८वीच्या मूल्यमापन परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांचे अत्यंत कमी गुण दिसून आले. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ३५ शिक्षकांची सेवा निलंबित करण्यात आली आहे. यामध्ये मलकापुर, शेगाव, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडर...

जागतिक पोहे दिवस.

जागतिक पोहे दिवस "चव, संस्कृती आणि आपुलकीचा दिवस" “ज्या पोह्यांच्या साक्षीने लग्नगाठी जुळतात, त्या पोह्यांचे वर्णन शब्दात कसे करणार?” हा प्रश्न नुसता विचारायचा नसतो, अनुभवायचा असतो... एकाच वेळी चव, संस्कृती, स्नेह आणि स्मृती जपणारा पदार्थ म्हणजे ‘पोहे’. प्रत्येक घरात कधी ना कधी पोहे झालेले असतात आणि कधी ना कधी कुणाच्या तरी पोहेमुळे आयुष्य बदललेलं असतं , अगदी “कांदेपोहे मीटिंग” पासून ते “म्हणजे पोहे करतात ना? म्हणजे घरचं आहे... ७ जून हा दिवस जगभरात "जागतिक पोहे दिवस" म्हणून साजरा केला जातो. २०१५ साली, ट्विटरवर गमतीने हा दिवस सुरू झाला. मॅगीच्या बंदीनंतर एका ट्विटर युजरने “#पोहेदिवस” अशी कल्पना मांडली, आणि पोहेप्रेमींच्या मनात ती घर करून बसली. कोणी याचा अधिकृत जनक नाही, पण ही कल्पना इतकी भावली की, पोह्यांना आपला दिवस मिळालाच. आपण कुठल्याही भागात राहात असलो, पण पोह्यांचं स्थान मनात एकच असतं – “पहाटेचा नाश्ता म्हटलं की पोहे हवेतच.” कांदे पोहे – सकाळचं संगीत म्हणजे पातेल्यातली फोडणी आणि कांद्याचा सुवास.बटाटे पोहे – चव आणि समाधान दोन्ही देणारे.दडपे...

समानीकरण आणि रिक्त जागा

१. समानीकरण (Rationalisation):  म्हणजे काय? समानीकरण म्हणजे विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षकांचे योग्य प्रमाणाने वाटप करणे. ज्या शाळांमध्ये शिक्षक अधिक आहेत तिथून शिक्षक कमी करून, शिक्षक-अभावी शाळांमध्ये त्या जागा भरल्या जातात. शाळांमध्ये शिक्षकांची अत्यल्प किंवा अतिरेक संख्या टाळणे. विद्यार्थी-शिक्षक प्रमाण (PTR) एकसमान ठेवणे.समानीकरणानंतर काही शिक्षक 'अतिरिक्त' ठरतात. २. संच मान्यता (Sanctioned Strength / Staffing Pattern):शासनाने एका शाळेसाठी निश्चित केलेली मंजूर पदसंख्या म्हणजे संचमान्यता. उदाहरण: एखाद्या शाळेत इयत्ता एक ते पाच वर्गाची एकूण पटसंख्या जर  61 विद्यार्थ्यांकरिता 3 शिक्षकांची मान्यता असेल, तर ती संचमान्य पदे. शाळेच्या स्तरावर शासनमान्य पदांची अंमलबजावणी.नियोजनबद्ध शिक्षक भरती व पदस्थापना.नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर 30 सप्टेंबर पर्यंत  किंवा विद्यार्थ्यांची संख्या वाढली/कमी झाली तर शाळेचा प्रस्ताव पाठवून नवीन संच मान्यता घेतली जाते.  ३. रिक्त पदे (Vacant Posts): एखाद्या शाळेतील संचमान्य पद अस्तित्वात आहे, पण त्या जागेवर कोणताही शिक्ष...